स्वप्ने पाहावी म्हणुनी, ठरवून झोपलो मी
स्वप्नांमधेही गर्द, अंधार पाहिला मी
उडण्याची आस धरुनी, जमिनीस पारखा झालो
तरंगावयाचा व्यर्थ, केला प्रयत्न तरी मी
हिंडलो जगी जरी या, मिरवीत शत मुखवटे
आरशात उद्ध्वस्त माझे, खरे रूप पाहिले मी
मज कौतुकले जगाने, औषधास दुःख नाही!
बोचून शल्य मनीचे, रडलो पुन्हा पुन्हा मी
जरी गावयाचे होते, लयबद्ध आनंदगाणे
सूर माझ्याच अंतरीचे, शकलो न आळवू मी
उमजून चुकलो परी हे, मी एकला न जगती
ऐसी लक्ष माणसे बघुनी, माझे मलाच सावरले मी..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा