Original Lyrics:
सखी मंद झाल्या..
सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?
मधुरात्र मन्थर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का?
हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा तो सूर तू होशील का?
जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे तू पूर्तता होशील का?
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी पण सांग तू येशील का?
मधुरात्र मन्थर देखणी, आली तशी गेली सुनी
हा प्रहर अंतिम राहिला, त्या अर्थ तू देशील का?
हृदयात आहे प्रीत अन् ओठांत आहे गीतही
ते प्रेमगाणे छेडणारा तो सूर तू होशील का?
जे जे हवेसे जीवनी ते सर्व आहे लाभले
तरीही उरे काही उणे तू पूर्तता होशील का?
बोलावल्यावाचूनही मृत्यू जरी आला इथे
थांबेल तोही पळभरी पण सांग तू येशील का?
English version:
The gleaming stars..
Yet you aren't in sight, will you ever be with me here?
Charming night of melancholy, has grown & receded slowly
To its last moments remaining, will you give a new meaning?
My heart brims with love & lips croon a sweet song
Stringing together dulcet tones, will you be my melodious twang?
I own everything ever desired by a soul,
Yet, a part of me feels missing, will you be the one who makes me whole?
Even if the angel of death comes calling on me,
He''ll hold on for a moment, But.. will you ever be here with me?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा